नागपूरमधील आजच्या वज्रमूठ सभेचं प्रमुख आकर्षण कोण? ठाकरे गटाच्या नेत्यानं नावचं सांगितलं
VIDEO | संभाजीनगरनंतर आता महाविकास आघाडीची दुसरी संयुक्त सभा नागपूरमध्ये, आणखी एक ठाकरे आजच्या सभेचं आकर्षण
नागपूर : महाविकास आघाडीची आज दुसरी वज्रमूठ सभा नागपूर येथे होणार आहे. या वज्रमूठ सभेची मविआकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. ही सभा कशी होणार? या सभेला कोण-कोण उपस्थित राहणार? याकडे साऱ्यांचे लक्ष लागलेले असताना नागपूरमध्ये होणाऱ्या वज्रमूठ सभेचे प्रमुख आकर्षण उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव तेजस ठाकरे असणार आहेत. तेजस हे तरुणांचे प्रेरणास्थान आणि आकर्षण आहे. मात्र ते भाषण वगैरे न करता प्रेक्षकांमध्ये बसून भाषण सभा पाहतील, अशी माहिती विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली आहे. दरम्यान, सध्या नागपूरातील वज्रमूठ सभेच्या ठिकाणी चोख सुरक्षा व्यवस्था करण्यात आली असून नागपूर पोलिसांच्या स्निफर डॅागस्कॅाडकडून सभास्थळाची चाचपणीही सुरू आहे. तर या सभेत उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात, अजीत पवार, नाना पटोले येणार असल्याने सुरक्षा यंत्रणा अलर्टवर असल्याचे पाहायला मिळत आहे.