घड्याळ गेलं, वेळ जुळली नाही पण… लग्न मंडपातच अमोल कोल्हेंची फटकेबाजी
पुण्यातील शिरूर येथे दिलीप मोहिते पाटलांच्या पुतणीच्या विवाह सोहळ्यात अमोल कोल्हेंची चांगलीच फटकेबाजी पाहायला मिळाली. घड्याळ गेलं, वेळ जुळली नाही पण वधुवरांच्या सुखाची 'तुतारी' वाजली पाहिजे, असं म्हणत अमोल कोल्हे यांनी लग्नाच्या मंडपातच प्रचाराचे फटाके फोडले
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आणि शरद पवार गट आणि अजित पवार गट तयार झाले. त्यानंतर निवडणूक आयोगाने अजित पवार यांना घड्याळ चिन्ह आणि पक्ष दिला. मात्र शरद पवार गटाकडून यानंतर एकच हल्लाबोल करण्यात आला. अशातच पुण्यातील शिरूर येथे दिलीप मोहिते पाटलांच्या पुतणीच्या विवाह सोहळ्यात अमोल कोल्हेंची चांगलीच फटकेबाजी पाहायला मिळाली. घड्याळ गेलं, वेळ जुळली नाही पण वधुवरांच्या सुखाची ‘तुतारी’ वाजली पाहिजे, असं म्हणत अमोल कोल्हे यांनी लग्नाच्या मंडपातच प्रचाराचे फटाके फोडले यावर आढळराव पाटीलांनी निशाणा साधला आणि ते म्हणाले, मंगलमय कार्यक्रमात वाचाळविरांसारखं बरळणं योग्य नाही, असे म्हणत खोचक टोला लगावला. खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटलांच्या पुतणीच्या विवाह सोहळ्यात अमोल कोल्हे यांनी घड्याळ आणि तुतारीचा मेळ घालत वधु वरांना विवाहाच्या शुभेच्छा दिल्यात. अमोल कोल्हे यांच्या या शुभेच्छा म्हणजे मंगलमय चांगल्या कार्यात वाचाळविरासारखं बरळं असं म्हणत आढळराव पाटीलांनी कोल्हेंवर पलटवार केल्याचे पाहायला मिळाले.