BEST Bus : 'बेस्ट'च्या बस चालकांची होणार ‘सरप्राईज टेस्ट’; महाव्यवस्थापकांचे कंत्राटदारांना 'बेस्ट' निर्देश

BEST Bus : ‘बेस्ट’च्या बस चालकांची होणार ‘सरप्राईज टेस्ट’; महाव्यवस्थापकांचे कंत्राटदारांना ‘बेस्ट’ निर्देश

| Updated on: Dec 13, 2024 | 12:49 PM

भाडे तत्वावरील बसच्या काही बस चालकांकडून कामावर असताना मद्य खरेदी केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. तर सोशल मीडियावर व्हिडीओ झाल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले असून ते अलर्ट झाले आहे.

मुंबईच्या कुर्ला परिसरात झालेल्या बेस्ट बस अपघातात सातहून अधिक जणांचा मृत्यू झाला त्यानंतर एकच खळबळ उडाली. या पार्श्वभूमीवर आता बेस्टच्या बस चालकांची सरप्राईज टेस्ट होणार असल्याची माहिती समोर येत आहे. भाडे तत्वावरील बसच्या काही बस चालकांकडून कामावर असताना मद्य खरेदी केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. तर सोशल मीडियावर व्हिडीओ झाल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले असून ते अलर्ट झाले आहे. करण्यात येणाऱ्या बेस्ट बस चालकांच्या चाचणीमध्ये सरप्राईज ब्रिथ अॅनालायझर टेस्ट होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार बेस्टच्या बसवर असलेल्या ड्रायव्हरची अशाप्रकारे ब्रिथ अनालायझर टेस्ट आधीपासूनच करण्यात येत आहे. मात्र आता भाडेतत्त्वावरील ड्रायव्हरची ब्रिथ ॲनालायझर टेस्ट करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये आगारातून बस प्रवासासाठी निघताना किंवा कोणत्याही ठिकाणी बस थांबवून ही टेस्ट करण्यात येऊ शकते यासाठी अधिकाऱ्यांची टीम तैनात करण्यात येईल. बेस्टच्या महाव्यवस्थापकांकडून कंत्राटदारांना या संदर्भातील निर्देश देण्यात आले आहेत.

Published on: Dec 13, 2024 12:49 PM