महायुतीत वादाची ठिणगी, रामदास कदमांच्या ‘त्या’ वक्तव्यावर फडणवीसांचं थेट उत्तर
जागावाटप नाहीतर शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी केलेल्या वक्तव्यामुळे महायुतीतील धुसफूस समोर आली आहे. रामदास कदम यांनी केलेल्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांनी थेट प्रत्युत्तर दिलं आहे. शिवसेना नेते रामदास कदम यांना टोकानं बोलायची सवय....
मुंबई, ७ मार्च २०२४ : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या जागावाटपावरुन आता अंतर्गत खटके उडण्यास सुरूवात झाल्याचे काहिसे पाहायला मिळत आहे. मात्र फडणवीस यांनी आपल्या मित्रपक्षांना योग्य जागा दिल्या जातील, असेही भाष्य केले होते. दरम्यान, जागावाटप नाहीतर शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी केलेल्या वक्तव्यामुळे महायुतीतील धुसफूस समोर आली आहे. रामदास कदम यांनी केलेल्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांनी थेट प्रत्युत्तर दिलं आहे. ‘शिवसेना नेते रामदास कदम यांना टोकानं बोलायची सवय आहे. आम्ही 115 तरी आम्ही खऱ्या शिवसेनेच्या शिंदेंना मुख्यमंत्री केलं’, असे म्हणत रामदास कदम यांनी भाजपबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना चांगलंच सुनावलं. तर केंद्रीय मंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील काही नेत्यांचे कान टोचावे, पक्ष प्रत्येकाला वाढवायचा आहे. पण तुमच्यावर विश्वास ठेवून जे लोकं आलेत, त्यांचा केसानं गळा कापू नये, भविष्यात वेगळा संदेश भाजपमधून जात आहे, याचं भान भाजपच्या काही नेत्याना असावं, असे म्हणत रामदास कदम यानी भाजपवर आगपाखड केली होती.