पोलीस सरकारचे दलाल म्हणून काम करत आहेत : Girish Mahajan
जो गुन्हा घडला नाही तो तुम्ही नोंद केला, माझ्याकडे पुरावे असताना अजूनही तक्रार नोंदवून घेत नाही, म्हणून बोलतो पोलिसांकडून आम्हाला मदत मिळणार नाही. पोलीस सरकाचे दलाल म्हणून काम करत आहेत, अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली आहे.
मुंबई : काही दिवसांपूर्वीच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी लाव रे तो व्हिडिओ म्हणत मोठा पेनड्राईव्ह बॉम्ब टाकला. भाजपमधल्या अनेक नेत्यांना खोट्या कटात फसवण्याचा डाव आखला जात असल्याचे व्हिडिओ (Devendra Fadnavis pen drive) मांडले. या व्हिडिओच्या माध्यमातून महाविकास आगाडीच्या नेत्यांविरोधात आरोपांची सरबत्ती केली. ज्या भाजप नेत्यांचा त्यात उल्लेख होता त्यात आमदार गिरीश महाजन (Girish Mahajan) यांचेही नाव होते. आता गिरीश महाजनही यावरून चांगलेच आक्रमक झाले आहेत. न्यायलयातून आम्ही हा न्याय मिळवून घेऊ. संजय पांडे साहेब आल्यावर आपल्याला कशी मदत मिळेल? तत्कालीन मंत्री कशी मदत करत आहेत? याचा उल्लेख त्यात आहेत, यात षडयंत्र स्पष्ट दिसून येत आहे. आता चव्हाण यांच्या विरोधात तक्रार करून 4 दिवस झाले, वरिष्ठांकडे विषय गेला आहे. जो गुन्हा घडला नाही तो तुम्ही नोंद केला, माझ्याकडे पुरावे असताना अजूनही तक्रार नोंदवून घेत नाही, म्हणून बोलतो पोलिसांकडून आम्हाला मदत मिळणार नाही. पोलीस सरकाचे दलाल म्हणून काम करत आहेत, अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली आहे.