‘त्यांचा जनाधार संपला की लोकशाही धोक्यात आली’, गोपीचंद पडळकर यांचा कुणावर रोख?
VIDEO | ... आता हे सांगतात लोकशाही धोक्यात येत आहे, गोपीचंद पडळकर यांनी नाव न घेता कुणावर साधला निशाणा?
सांगली : नुकताच देशातील वरिष्ठ नेत्यांनी पंतप्रधानांना वेगवेगळ्या मुद्यावरून पत्र लिहिले आहे. त्यावर बोलताना भाजपच्या कार्यकाळात लोकशाही धोक्यात आली असल्याची टीका शरद पवार यांनी केली होती. त्यावर आमदार गोपीचंद पडळकरांनी असे म्हटले की, शरद पवार यांचा जनाधार कमी झाला की, लोकशाही धोक्यात ये हेच यांचे जुने भांडवल असल्याची टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे. राष्ट्रवादी पक्ष स्थापन झाल्यापासून शरद पवार हे एकटेच अध्यक्ष आहेत आणि आता हे सांगतात लोकशाही धोक्यात येत आहे असे म्हणून त्यांच्यावर त्यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. तर राज्य सरकारचे कौतूक करताना गोपीचंद पडळकर यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या कामाचे कौतूक करत त्यांनी राज्यातील हे सरकार चांगले काम करत असल्याचे म्हटले आहे.
Published on: Mar 06, 2023 09:48 PM