आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची नवी रणनिती, ५ हजार युवा 'नमो वॉरियर्स' उतरणार मैदानात

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची नवी रणनिती, ५ हजार युवा ‘नमो वॉरियर्स’ उतरणार मैदानात

| Updated on: Jan 31, 2024 | 1:00 PM

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने मुंबईत नवी रणनिती आखण्यास सुरूवात केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचे तब्बल ५ हजार युवा कार्यकर्ते मैदानात उतरणार आहेत. पहिल्या टप्प्यात प्रत्येक महाविद्यालयातून ५० हजार युवक आणि युवतींची निवड करण्यात येणार आहे.

मुंबई, ३१ जानेवारी २०२४ : येत्या १६ जून २०२४ रोजी १७ व्या लोकसभेचा कार्यकाळ पूर्ण होत असल्याने निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने मुंबईत नवी रणनिती आखण्यास सुरूवात केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचे तब्बल ५ हजार युवा कार्यकर्ते मैदानात उतरणार आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी कामकाज करणाऱ्या या युवा कार्यकर्त्यांची भाजप युवा मोर्च्याच्या माध्यमातून नमो वॉरियर्स म्हणून नेमणूक करणार आहे. याकरता पहिल्या टप्प्यात प्रत्येक महाविद्यालयातून ५० युवक आणि युवतींची निवड करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामकाजांची माहिती मतदारांपर्यंत पुरवण्याची जबाबदारी या ५ हजार नमो वॉरियर्सवर म्हणजेच युवक आणि युवतींवर असणार आहे. तर आगामी लोकसभा निवडणुकीकरता काम करणाऱ्या या ५ हजार युवक आणि युवतींना भाजपकडून मानधन दिलं जाणार आहे.

Published on: Jan 31, 2024 01:00 PM