बारसूतील रिफायनरीवरून मुख्यमंत्री शिंदे आणि शरद पवार यांची भेट; काय आहेत संकेत?
सरकारकडून प्रकल्पासाठी स्थानिक नागरिकांवर दडपशाही सुरु असल्याची टीका केली जात आहे. याचवेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बारसू प्रकल्पाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधान आलं आहे.
रत्नागिरी : येथील बारसू रिफायनरी प्रकल्पासाठी सर्वेक्षण सुरु झालं आहे. या सर्वेक्षणाला स्थानिक नागरिकांकडून तीव्र विरोध दर्शविला जात आहे. याचवरुन सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले आहेत. सरकारकडून प्रकल्पासाठी स्थानिक नागरिकांवर दडपशाही सुरु असल्याची टीका केली जात आहे. याचवेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बारसू प्रकल्पाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधान आलं आहे. तर स्थानिकांसह मविआतील उद्धव ठाकरे गटाने विरोध दाखवल्याने शिंदे यांनी पवार यांची भेट घेतली आहे. तसेच याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका काय असेल यासह सरकारची भूमिका काय आहे हे सांगण्यासाठी भेट घेतली आहे. याच्याआधी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी देखील पवार यांची भेट घेत सरकाची बाजू मांडली होती.
Published on: Apr 26, 2023 02:11 PM