मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट सांगितलं, बंजरंग दलावर बंदीची मागणी म्हणजे…,
VIDEO | येत्या १० तारखेला कर्नाटकात भाजपला प्रचंड बहूमत मिळेल, मुख्यमंत्री भाजपच्या प्रचारासाठी मैदानात
बेळगाव : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कर्नाटक निवडणुकीच्या प्रचारासाठी रिंगणात उतरले आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील रविवारी बंगळुरूमध्ये होते. रविवाकी सकाळी बंगळुरूमध्ये ८ किमीचा रोड शो त्यांनी केला. यावेळी पंतप्रधानांच्या चाहत्यांनी रस्त्यावर तसेच इमारतीवर गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, काँग्रेसने पंतप्रधान मोदींवर खालच्या पातळीवर टीका केली. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले आहे. आपली मर्यादा सोडून काँग्रेस नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका आणि आरोप करताय, हे अतिशय दुर्दैवी आहे. यापूर्वी देखील मोदींवर मर्यादा सोडून काँग्रेसकडून टीका करण्यात आली होती. त्या-त्या वेळी काँग्रेसला याचं प्रायश्चित्त मिळालं आहे. मोदींनी बदला न घेता जनतेने काँग्रेसचा बदला घेतला असल्याचे शिंदे यांनी म्हटले. तर काँग्रेस आधी 400 वर होती आणि आता ती 40 च्या घरात आहे. आता त्यांचे 4 चं येतील असा घणाघात मुख्यमंत्री शिंदे यांनी केला आहे. यावेळी त्यांनी बंजरंग दलावर होत असलेल्या बंदीच्या मागणाीवरही त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली.