‘शरद पवार यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवणारा माणूस महाराष्ट्रात नाही’, कुणी लगावला खोचक टोला?
VIDEO | 'शरद पवार यांच्या राजकारणावर किंवा त्यांनी केलेल्या राजकीय वक्तव्यांवर कोणीही विश्वास ठेवत नाही', एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा नेता संजय शिरसाट यांचा हल्लाबोल, काय केली सडकून टीका?
छत्रपती संभाजीनगर, २४ सप्टेंबर २०२३ | शरद पवार यांनी अहमदाबाद येथे गौतम आदानी यांच्या निवासस्थानी नुकतीच भेट घेतली. या भेटीनं राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असताना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी मोठं वक्तव्य केले आहे. ‘शरद पवार कधी कोणत्या पक्षात जातील कोणासोबत युती करतील हे कोणीच सांगू शकत नाही. आज शरद पवार इंडिया आघाडीमध्ये दिसतील, उद्या दुसरीकडे दिसतील तर परवा अकेला चलोच्या भूमिकेत दिसतील.’, असे म्हणत संजय शिरसाट यांनी शरद पवार यांना खोचक टोला लगावला आहे. पुढे संजय शिरसाट असेही म्हणाले की, शरद पवार यांच्या राजकारणावर किंवा त्यांनी केलेल्या राजकीय वक्तव्यांवर कोणीही विश्वास ठेवत नाही, ही सत्यता आहे. म्हणून शरद पवार यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवणारा महाराष्ट्रात नाही, असे म्हणत संजय शिरसाट यांनी शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे.