मुख्यमंत्री शिंदे यांनी पंतप्रधान मोदी यांना आपल्या फोनमध्ये दाखवलं तरी काय?
मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या फोनमधून पंतप्रधान मोदींना काहीतरी दाखवले. पंतप्रधान मोदींनी देखील शिंदे दाखवत असलेले सर्व फोटो पाहिले. दरम्यान, पंतप्रधान आणि मोदी यांच्या संवादाचे क्षण कॅमेऱ्यात कैद झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १९ जानेवारी रोजी मुंबईच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांच्या हस्ते विविध विकास कामांचे लोकार्पण झाले. यानंतर बीकेसीच्या मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभाही झाली. या कार्यक्रमात सर्वांत प्रथम देवेंद्र फडणवीस यांचे भाषण झाले. फडणवीस बोलत असताना व्यासपीठावर बसलेल्या प्रमुख पाहुण्यांमध्ये वेगळाच प्रकार बघायला मिळाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपापसात काहीतरी बोलत असताना दिसले. शिंदेंनी आपल्या फोनमधून पंतप्रधान मोदींना काही तरी दाखवले.
पंतप्रधान मोदींनी देखील शिंदे दाखवत असलेले सर्व फोटो पाहिले. दरम्यान, पंतप्रधान आणि मोदी यांच्या संवादाचे क्षण कॅमेऱ्यात कैद झाले. पंतप्रधान मोदींना फोटो दाखवल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणावेळी मोदींविषयी एक किस्सा सांगितला. शिंदे नुकतेच दावोस दौऱ्यावरून परतले. दौऱ्यावेळी त्यांना कोणता अनुभव आला याविषयी शिंदे यांनी आपल्या भाषणा मोदींच्या विषयाचा अनुभव सांगितला. ते म्हणाले, अनेक देशांच्या लोकांनी माझ्यासह फोटो काढले आणि हे फोटो मोदीजींना दाखवा असं त्यांनी मला सांगितले. त्यामुळे दावोस मध्येही मला मोदींचा करिश्मा दिसल्याचे शिंदेंनी म्हटले.