रवींद्र धंगेकर घेणार राज ठाकरेंची भेट; उद्या होणार शपथविधी

| Updated on: Mar 08, 2023 | 10:17 AM

रवींद्र धंगेकर यांचा आमदार म्हणून शपथविधी होणार आहे. यावेळी त्यांनी, गेल्या 30 वर्षांमध्ये समाजाशी जोडलेल्या नाळेचं फळ आज मिळत असल्याचे म्हटलं

मुंबई : पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर विजयी झाले. त्यांच्या या विजयामुळे गेली 35 वर्षे भाजपकडे असणारा मतदार त्यांचा बालेकिल्ला जिंकता आला. त्यामुळे महाविकास आघाडीनं एकच जल्लोष केला. त्यानंतर आता रवींद्र धंगेकर यांचा आमदार म्हणून शपथविधी होणार आहे. यावेळी त्यांनी, गेल्या 30 वर्षांमध्ये समाजाशी जोडलेल्या नाळेचं फळ आज मिळत असल्याचे म्हटलं. त्याचबरोबर आपण शपथविधीच्या आधी महाविकास आघाडीतील नेत्यांना आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे म्हटलं आहे.

Published on: Mar 08, 2023 10:17 AM