Nana Patole : विधानसभेतील पराभवानंतर मोठा निर्णय, नाना पटोलेंचं थेट दिल्लीत पत्र; खर्गेंकडे काय केली मागणी?

Nana Patole : विधानसभेतील पराभवानंतर मोठा निर्णय, नाना पटोलेंचं थेट दिल्लीत पत्र; खर्गेंकडे काय केली मागणी?

| Updated on: Dec 13, 2024 | 3:53 PM

राज्यातील पराभवाची जबाबदारी स्वीकारत आणि विधानसभेतील पराभवानंतर नाना पटोले यांनी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर दिल्लीत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंना पत्र लिहील्याची माहिती मिळत आहे.

नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालात महायुतीला तब्बल २३७ जागांवर विजय मिळाला होता तर महाविकाआघाडीला ४९ जागा मिळाल्या असून अर्धशतक देखील गाठता आलं नव्हतं. त्यात काँग्रेसला केवळ १७ जागांवरच समाधान मानावे लागले होते. त्यामुळे राज्यातील पराभवाची जबाबदारी स्वीकारत आणि विधानसभेतील पराभवानंतर नाना पटोले यांनी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर दिल्लीत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंना पत्र लिहील्याची माहिती मिळत आहे. नाना पटोले यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहून जबाबदारीतून मुक्त करावे, अशी मागणी केली आहे. तर गेल्या 4 वर्षांपासून मी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. ‘मला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदावर चार वर्ष पूर्ण झाली असून आता प्रदेश काँग्रेस कमिटी बरखास्त करावी, तसेच नवी कमिटी स्थापन करा, मला पदावरून मुक्त करा’, असे नाना पटोले यांनी म्हटले असून त्यांच्याकडून मल्लिकार्जुन खर्गे यांना एक पत्र देण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. दरम्यान, विधानसभा निकालानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावरुन नाना पटोले पायउतार होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र नाना पटोले यांच्याकडून राजीनाम्याचा कोणताही निर्णय झाला नसल्याचे त्यांच्या कार्यालयातून स्पष्ट करण्यात आले होते. त्यानंतर, आता पुन्हा नाना पटोले यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू झाली आहे.

Published on: Dec 13, 2024 03:53 PM