आदित्य ठाकरे यांनी कुणी दिली लग्नाची धमकी? बघा स्मितहास्य करत म्हणाले…
VIDEO | बच्चू कडू यांच्या प्रश्नावरून विधिमंडळात देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांना काढला चिमटा, आदित्य ठाकरे यांनीही खास शैलीत केला पलटवार
मुंबई : आदित्य ठाकरे यांच्या लग्नाची जबाबदारी सरकार घेईल, बच्चू कडू यांच्या प्रश्नावरून विधिमंडळात देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांना चिमटा काढल्याचे पाहायला मिळाले. तर यावर ‘ही राजकीय धमकी होती का?’ असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी त्यांच्याच खास शैलीत पटलवार देखील केला. विधिमंडळात बच्चू कडू यांनी प्रकल्प बंद झाल्यामुळे कामगार रस्त्यावर येत आहे असा विषय मांडताना आधी लग्न जमलं आणि तुटलं त्याची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न विचारला. यावर मिश्किलपणे उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, लग्न जोडण्याची जबाबदारी सरकारची तुटलं तर त्याला सामान्य जबाबदारी सरकारची आहे पण आपण जी सूचना केली आहे तपासून पाहता येईल आणि त्यासंदर्भात काही धोरण तयार करता येईल का आपण बघू. पहिल्यांदा तर माननीय बच्चू कडूंनी प्रश्न आदित्य ठाकरे यांच्याकडे पाहून विचारला होता का? सरकारने लग्न लावायचं तर सरकार लग्नाची जबाबदारी घ्यायला तयार आहे.