'या' विषयावर राजकारण करू नका, हा राजकीय विषय नाही; विधिमंडळात देवेंद्र फडणवीस यांचा आवाज चढला

‘या’ विषयावर राजकारण करू नका, हा राजकीय विषय नाही; विधिमंडळात देवेंद्र फडणवीस यांचा आवाज चढला

| Updated on: Mar 08, 2023 | 3:24 PM

Devendra Fadnavis : विधानसभेत बोलताना विरोधकांनी आज सरकारला प्रश्न विचारले. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी करण्यात आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिलं. पाहा...

मुंबई : विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे. आज विधानसभेत बोलताना विरोधकांनी सरकारला प्रश्न विचारले. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी विविध मुद्दे मांडण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिलं. “काल नुकसान झालं की आज भरपाई देता येत नाही. तुम्हालाही माहिती आहे की, पंचनामे करावे लागतात. त्यामुळे पंचनामे झाले की आम्ही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य ती मदत करू. सरकरा शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे”, असं फडणवीस म्हणाले. यावेळी विरोधकांनी एकच गोंधळ केला. तेव्हा फडणवीस म्हणाले, “हा राजकारणाचा विषय नाही. विरोधकांनी राजकारण करू नये.”

Published on: Mar 08, 2023 03:24 PM