Breaking | अफगाणिस्तानात तालिबान सरकारची स्थापना, मुल्ला हसन अखुंद पंतप्रधानपदी

| Updated on: Sep 07, 2021 | 9:16 PM

मिळालेल्या माहितीनुसार तालिबान सरकारचे तसेच अफगाणिस्तानचे पंतप्रधान हे मुल्ला मोहम्मद हसन अखूंद हे असणार आहेत. तशी घोषणा नुकतीच करण्यात आली. अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या नव्या मंत्रिमंडळाची घोषणा करण्यात आलीय.

काबुल : अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर तालिबान आपला कारभार कसा हाकणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली होती. तालिेबानचं सरकार नेमकं कधी स्थापन होणार असाही प्रश्न विचारला जात होता. मात्र, तालिबानने आपल्या मंत्रिमंडळाची नुकतीच घोषणा केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार तालिबान सरकारचे तसेच अफगाणिस्तानचे पंतप्रधान हे मुल्ला मोहम्मद हसन अखूंद हे असणार आहेत. तशी घोषणा नुकतीच करण्यात आली. अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या नव्या मंत्रिमंडळाची घोषणा करण्यात आलीय. यात मुल्ला हसन अखूंद हे अफगाणिस्तानचे पंतप्रधान असतील. तालिबानच्या प्रवक्त्यानं मंत्रिमंडळाची घोषणा पत्रकार परिषदेत केली. अखूंद हे पंतप्रधान असतील तर ज्यांच्या नावाची पंतप्रधानपदासाठी चर्चा होती, ते मुल्ला बरादर हे उपपंतप्रधान असतील. तालिबानच्या या मंत्रिमंडळात हक्कानींना वजनदार मंत्रिपद भेटलेलं आहे. सिराजुद्दीनं हक्कानी हे गृहमंत्री असतील.