आपल काय चुकलं हेच ठाकरेंना अजून कळलं नाही, गजानान कीर्तिकरांचा निशाणा

“आपल काय चुकलं हेच ठाकरेंना अजून कळलं नाही”, गजानान कीर्तिकरांचा निशाणा

| Updated on: Jun 19, 2023 | 3:54 PM

शिंदेंच्या शिवसेनेने वर्धापनदिन नाही तर जागितक गद्दार दिन साजरा करावा असा टोला ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावला होता. यावर शिवेसनेचे ज्येष्ठ नेते आणि खासदार गजानन कीर्तिकर यांनी पलटवार केला आहे.

मुंबई : शिंदेंच्या शिवसेनेने वर्धापनदिन नाही तर जागितक गद्दार दिन साजरा करावा असा टोला ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावला होता. यावर शिवेसनेचे ज्येष्ठ नेते आणि खासदार गजानन कीर्तिकर यांनी पलटवार केला आहे. “ठाकरे यांना खोक्यांशिवाय दुसरं काही समजत नाही, आपलं काय चुकलं हेच ठाकरेंना अजून कळलं नाही. ते दिशाभूल करत आहेत. इतके आमदार, खासदार, पदाधिकारी गेले, त्यांना डोकं नाही का? ही सगळीळ लोकं विचार करून गेले, त्यांच्यावर अन्याय झाला, असं गजानन कीर्तिकर म्हणाले. तसेच संजय राऊत महाराष्ट्रातील मनोरंजनाचे एक पात्र आहेत,” असं देखी कीर्तिकर म्हणाले.

Published on: Jun 19, 2023 03:54 PM