मंत्रीपदी निवड झाल्यानंतर मुश्रीफ यांचं मतदारसंघात जल्लोषी स्वागत; गडहिंग्लजमध्ये जेसीबीने फुलांची उधळण
प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शरद पवार हेच आपले आजही दैवत असून येत्या काळात राष्ट्रवादी पक्ष मजबूत करण्यासाठी जोमाने कामाला लागण्याचे सूचना मंत्री मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.
कोल्हापूर : राज्य मंत्रिमंडळात मंत्रीपदी निवड झाल्यानंतर हसन मुश्रीफ यांचं गडहिंग्लज शहरात जल्लोषी स्वागत करण्यात आलं. यावेळी त्यांच्यावर जेसीबीच्या सहाय्याने फुलांची उधळण देखील करण्यात आली. शहरातून बाईक रॅली काढत मिरवणूक ही पार पडली. प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शरद पवार हेच आपले आजही दैवत असून येत्या काळात राष्ट्रवादी पक्ष मजबूत करण्यासाठी जोमाने कामाला लागण्याचे सूचना मंत्री मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना दिल्या. तर याचदरम्यान फक्त ईडीच्या चौकशीला घाबरून ते अजित पवार यांच्याबरोबर गेले अशी टीका जिल्ह्याती सामान्य कार्यकर्त्याकडून होत होती. त्यानंतर आता मुश्रीफ यांनी कोल्हापूरमध्ये आपण ईडीच्या भीतीने सत्तेत गेलो हे डोक्यातून काढून टाका असे म्हणाले होते. तर आपल्याला ईडीच्या कारवाईत न्यायालयाने मला दिलासा दिल्याचंही त्यांनी म्हटलं.