आता कसं वाटतंय? बरं वाटलं, गार गार वाटलं, पण आता... रोहित पवार यांची खोचक टीका

आता कसं वाटतंय? बरं वाटलं, गार गार वाटलं, पण आता… रोहित पवार यांची खोचक टीका

| Updated on: Sep 23, 2023 | 11:47 PM

महाराष्ट्रातल्या जनतेचे प्रश्न सुटत नाहीत. सरकारचं लक्ष फक्त सत्तेवर आहे. लोकांच्या परिस्थितीवर नाही. भाजपबरोबर गेल्यानंतर सुरुवातीला बरं वाटलं, गार गार वाटलं. पण, आता कुठे तरी भाजपाची प्रवृत्ती समोर यायला लागली. ती त्यांना दिसायला लागली असा टोला अजितदादांना लगावला.

टिटवाळा : 23 सप्टेंबर 2023 | राजकारणात ज्या पद्धतीचा द्वेष, जाती धर्म करणारी प्रवृत्तीचे लोक पसरत आहेत या सगळ्या गोष्टी कुठेतरी बाजूला जाव्यात. सामान्य लोकांचे हिताचे प्रश्न मांडण्यासाठी आणि सोडवण्यासाठी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना शक्ती द्यावी असे साकडे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी घातले. टिटवाळ्यातील महागणपतीचे दर्शन रोहित पवार यांनी घेतले. त्यावेळी माध्यम प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी विकासकामांवरून सरकारवर टीका केली. सरकारमध्ये असणारे नेते फक्त मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पद आणि आमदारांना जवळ ठेवण्यासाठी त्यांना खुष ठेवण्यासाठी व्यस्त असतील तर जिल्हा प्रशासन इतर सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून सामान्य लोकांचे प्रश्न कसे सोडणार असा सवाल त्यांनी केला.

Published on: Sep 23, 2023 11:47 PM