मालवणमधील शिवरायांचा पुतळा कोसळला कसा? ‘ही’ 4 कारणं समोर, स्थानिक जे म्हणत होते तेच खरं निघालं

| Updated on: Sep 27, 2024 | 11:35 AM

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्यावरून राज्यात अद्याप राजकारण सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. कमिटीनं पुतळा का पडला यासाठी 16 पानी अहवाल दिला आहे. ज्यात दुर्घटनेमागे 4 प्रमुख कारणं दिली गेली आहेत.

मालवणमधील शिवरायांचा पुतळा कोसळला कसा? ही 4 कारणं समोर, स्थानिक जे म्हणत होते तेच खरं निघालं
Follow us on

 शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा कशामुळे पडला? या रिपोर्ट आता समोर आला आहे. त्यात पुतळा कोसळण्याचे चार कारणं समोर आली आहेत. त्यामुळे या रिपोर्टवरून सरकार दोषींवर कारवाई करणार का? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.  शिवरायांचा पुतळा हा हवेने नव्हे तर निकृष्ट दर्जाचे काम आणि देखभाली आभावी पडल्याचे समोर आले आहे. पाच जणांच्या कमिटीने पतळा कोणत्या कारणाने कोसळला यावर १६ पानी हलवाल दिला. या अहवालात दुर्घटना घडल्याची चार प्रमुख कारणं समोर आली आहे. यामध्ये पुतळ्याला गंज लागला होता, डिझाईनमध्ये चूक, निकृष्ट वेल्डिंग करण्यात आलं आणि उद्घाटनानंतर पुतळ्यावर दुर्लक्ष करण्यात आलं. त्यामुळे पुतळा ताशी २५ किमी वाऱ्याचे वेगाने पडला किंवा नवीन पुतळा उभारला जावा अशी शिवरायांची इच्छा असेल हे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिलेलं कारण चूक ठरलं आहे. दुर्घटना घडल्यानंतर या परिसरात राहणारे स्थानिक लोक जे सांगत होते तेच अखेर खरं ठरलंय. त्यामुळे सरकार आता दोषींवर काय कारवाई करतं? हे पाहणं महत्त्वाचं आहे.