Video | फास्ट न्यूज महत्त्वाच्या घडामोडी
शिवसेनेचा मराठी आणि हिंदुत्व हे दोन्ही विषय महत्त्वाचे असल्याचे वक्तव्य संजय राऊत यांनी केलं. हिंदुत्वाचा बुलंद आवाज म्हणजे शिवसेनाच, असा टोला संजय राऊत यांनी भाजपला लगावला आहे.
दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी
1) भविष्यात शिवसेना दिल्लीमध्ये चांगलं काम करेल, असा विश्वास खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेच्या 55 व्या वर्धापनदिनी व्यक्त केला आहे.
2) शिवसेनेसाठी मराठी आणि हिंदुत्व हे दोन्ही विषय महत्त्वाचे असल्याचे वक्तव्य संजय राऊत यांनी केलं. हिंदुत्वाचा बुलंद आवाज म्हणजे शिवसेनाच, असा टोला संजय राऊत यांनी भाजपला लगावला आहे.
3) भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर टीका केली. शिवप्रसाद काय असतो ते संजय राऊतांनी आमदार वैभव नाईक यांना विचारावं, आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांना पोटभर प्रसाद दिला आहे. पाहिजे असेल तर तुमच्यासाठी मी सामना ऑफिसमध्ये पार्सल घेऊन येतो. टेस्ट आवडेल, असे राणे म्हणाले.
4) निलेश आणि नितेश राणे काहीच करु शकत नाहीत, ते नुसते बोलतात. आपण कोणामुळे मोठे झालो हे विसरु नये, अशा शब्दांत चंद्रकांत खैरै यांनी राणे बंधूंवर टीका केली आहे.