कल्याणमध्ये जलवाहिनी फुटली, लाखो लिटर पाणी वाया, नागरिक त्रस्त

कल्याणमध्ये जलवाहिनी फुटली, लाखो लिटर पाणी वाया, नागरिक त्रस्त

| Updated on: Mar 23, 2023 | 10:02 AM

Kalyan News : कल्याणमधील आधारवाडी गणेश चौक परिसरामध्ये ही घटना घडलीये. जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी रस्त्यावर आल्याचं पाहायला मिळालं. पाहा व्हीडिओ...

कल्याण : कल्याणमध्ये जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेलं आहे. कल्याणमधील आधारवाडी गणेश चौक परिसरामध्ये ही घटना घडलीये. जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी रस्त्यावर आल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला. नागरिकांना पाण्यातून मार्ग काढत प्रवास करावा लागला आहे. स्थानिक नगरसेवक आणि पालिका अधिकारी घटनास्थळी धाव घेत जेसीपीच्या सहाय्याने पाण्याचा निचरा करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. ठाणे महापालिकेच्या स्टेम प्राधिकरणाची 1800 एम.एम व्यासाची ही जलवाहिनी आहे. व्हॉल लिकेज झाल्याने घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.