Karnataka Election Result : कर्नाटकात काँग्रेसच्या बाजूने जनतेचा कौल; राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, गदा…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजरंगबली की जय म्हणत काँग्रेसविरोधात मतदार करा असे आवाहन मतदारांना केलं होतं. त्यावरून उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी मोदींसह भाजप टीका केली आहे.
मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये काँग्रेस आघाडीवर आहे. काँग्रेस समर्थकांनी एआयसीसी मुख्यालयाबाहेर जल्लोष केला. यावेळी काँग्रेस कार्यकर्ते मिठाई वाटताना दिसले. तसेच, हनुमानाला मिठाईचा नैवेद्यही दाखवण्यात आला. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजरंगबली की जय म्हणत काँग्रेसविरोधात मतदार करा असे आवाहन मतदारांना केलं होतं. त्यावरून उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी मोदींसह भाजप टीका केली आहे. यावेळी राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका करताना कर्नाटकात भाजपच्या नेत्यांनी तंबू ठोकला होता. पण मोदी आणि शहा यांना लोकांनी झिडकारलं आहे. कर्नाटकमध्ये फक्त लोकशाहीची स्टोरी चालली. बजरंग बलीची गदा भाजपाच्या डोक्यावर पडली असा घणाघात केला आहे.
Published on: May 13, 2023 11:15 AM
Latest Videos