‘आम्ही एक एक करून नाही तर सर्वांनाच घेणार’; शिंदे गटाच्या खासदाराचा ठाकरे यांना टोला
तर मख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. आजही ठाकरे गटाला धक्के बसतना दिसत असून नेते शिंदेंकडे जात आहेत. यावरून ठाण्यात हिंदी भाषिकांच्या मेळाव्यात ठाकरे यांनी एक एक काय फोडता सगळ्यांनाच घेऊन जा असे आव्हान भाजपसह शिंदे गटाला दिले होते.
मुंबई, 31 जुलै, 2023 | शिवसेना प्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फुटून आता एक वर्ष होत आहे. यादरम्यान अनेक पदाधिकारी आणि नेत्यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे. तर मख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. आजही ठाकरे गटाला धक्के बसतना दिसत असून नेते शिंदेंकडे जात आहेत. यावरून ठाण्यात हिंदी भाषिकांच्या मेळाव्यात ठाकरे यांनी एक एक काय फोडता सगळ्यांनाच घेऊन जा असे आव्हान भाजपसह शिंदे गटाला दिले होते. यावरून शिंदे गटाचे नेते खासदार श्रीकांत शिंदे यांनी पलटवार करताना, ते आपल्याला का सोडून जातायत याचा कधी विचार करणार आहात की नाही असा सवाल केला होता. तर जरा आत्मपरिक्षण करा असा सल्लाही दिला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा खासदार शिंदे यांनी ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. यावेळी त्यांनी आम्ही आता एक एक नाही तर सगळ्यांना सोबत घेणार आहे. फक्त तुम्ही बघत बसा असा टोला लगावला आहे.