MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 1 September 2021

| Updated on: Sep 01, 2021 | 7:57 AM

औरंगाबाद धुळे महामार्गावरील कन्नड घाटात दरड कोसळली होती. दरड कोसळून अनेक गाड्या चिखलात अडकल्या. दरड कोसळून रस्ता पूर्णपणे बंद झाला. त्यामुळे अनेक नागरिक घाटात अडकले.

चाळीसगाव राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 211 वर कन्नड घाटातील वाहतूक ठप्प झाली होती. दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाल्यामुळे अनेक वाहने आणि प्रवासी अडकले होते. त्यानंतर चाळीसगाव मार्गे औरंगाबाद जाण्यासाठी इतर मार्गाने प्रवास करावा असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. औरंगाबाद धुळे महामार्गावरील कन्नड घाटात दरड कोसळली होती. दरड कोसळून अनेक गाड्या चिखलात अडकल्या. दरड कोसळून रस्ता पूर्णपणे बंद झाला. त्यामुळे अनेक नागरिक घाटात अडकले. या घटनेची ड्रोन दृश्यं कैद झाली आहेत

कन्नड घाटात प्रशासनाकडून मदत कार्य सुरू करण्यात आले. घाटात अजूनही काही प्रमाणात पाऊस पडत आहे. दरडीखाली म्हशी घेऊन जाणारा ट्रकवर ही दरड कोसळली या घटनेत ट्रक ड्रायव्हर मृत्युमुखी पडला असून या घटनेत अनेक म्हशीना आपला जीव गमवावा लागला आहे

4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 1 September 2021
FYJC Admission | अकरावीच्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना दिलासा, जात प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ