ग्रामपंचायत निवडणुकीत ठाकरे बाजी, शिंदे गटाचं काय झालं? पहा नव्या अपडेट महाफास्ट न्यूज 100

| Updated on: Oct 17, 2022 | 7:24 PM

राज्यातील 1165 ग्रामपंचायतींच्या निकालामंध्ये शिंदे गट आणि ठाकरे गट कोण बाजी मारणार याकडेही अनेकांचे लक्ष लागून राहिले होते. यावेळी ठाकरे गटाने शिंदे गटाला धोबीपछाड देत बाजी मारली आहे. 153 ग्रामपंचायतींवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा झेंडा फडकवला आहे.

राज्यात हाती आलेल्या ग्रामपंचायतींच्या निकालानंतर भाजपच नं 1 पक्ष असल्याचे समोर आले आहे. तर 889 पैकी 397 ग्रामपंचायतींवर भाजप विजयी झाल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. यादरम्यान राज्यात राम शिंदे यांनी राज्यात भाजप-शिंदेंचे सरकार आले आणि पुन्हा एकदा भाजपनं सर्वाधिक जागा जिंकल्याचं म्हटलं आहे. तर भाजप सर्वोच्च स्थानी असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. राज्यातील 1165 ग्रामपंचायतींच्या निकालामंध्ये शिंदे गट आणि ठाकरे गट कोण बाजी मारणार याकडेही अनेकांचे लक्ष लागून राहिले होते. यावेळी ठाकरे गटाने शिंदे गटाला धोबीपछाड देत बाजी मारली आहे. 153 ग्रामपंचायतींवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा झेंडा फडकवला आहे. तर पालघरमध्ये माकपचे आमदार विनोद निकोले यांना धक्का बसला आहे. उर्से ग्रामपंचायतीत आमदार निकोलेंच्या बहिणीचा पराभव झाला आहे.

Published on: Oct 17, 2022 07:24 PM
अपक्ष आणि स्थानिक आघाड्यांना देखिल यश, पहा किती जागा मिळाल्या? 36 जिल्हे 72 बातम्यांमध्ये
ग्रामपंचायतींचा निकाल, भाजप नंबर वन तर राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या क्रमांचा पक्ष, यासह पहा 4 मिनिट 24 हेडलाईन्स