Maharashtra Cabinet expansion : कोण पुन्हा मंत्री? रविवारी भाजप, शिवसेनेसह राष्ट्रवादीचे कोणते नेते घेणार मंत्रिपदाची शपथ, बघा यादी

Maharashtra Cabinet expansion : कोण पुन्हा मंत्री? रविवारी भाजप, शिवसेनेसह राष्ट्रवादीचे कोणते नेते घेणार मंत्रिपदाची शपथ, बघा यादी

| Updated on: Dec 13, 2024 | 5:20 PM

येत्या १६ डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशन नागपुरात होणार आहे. यापूर्वी १५ तारखेला नागपुरातच मंत्र्याचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नव्या सरकारमधील नव्या मंत्र्याचा शपथविधी होणार आहे.

राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तार केव्हा होणार याकडे राजकीय नेत्यांसह अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून होते. अखेर राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख समोर आली आहे. येत्या १६ डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशन नागपुरात होणार आहे. यापूर्वी १५ तारखेला नागपुरातच मंत्र्याचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नव्या सरकारमधील नव्या मंत्र्याचा शपथविधी होणार आहे. अशातच रविवारी भाजप, शिवसेनेसह राष्ट्रवादीचे कोणते नेते मंत्रिपदाची शपथ घेणार याची संभाव्य यादीच समोर आली आहे. भाजपमधून प्रवीण दरेकर, मंगलप्रभात लोढा, बबनराव लोणीकर, पंकजा मुंडे, आशिष शेलार किंवा योगेश सागर, संभाजी निलंगेकर, जयकुमार रावल, शिवेंद्र राजे भोसले, नितेश राणे, देवयानी फरांदे, राहुल आहेर, राहुल कुल, चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, रविंद्र चव्हाण आणि विजय कुमार गावित हे भाजपचे संभाव्य मंत्री आहेत जे मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून कोण घेऊ शकतं मंत्रिपदाची शपथ?

Published on: Dec 13, 2024 05:20 PM