देवेंद्र फडणवीसांचं वक्फ बोर्ड दुरूस्ती विधेयकासंदर्भात मोठं वक्तव्य, ‘जिथे बोट ठेवतील ती त्यांची जमीन…’
Waqf Board Amendment Bill : वक्फ बोर्ड दुरूस्ती विधेयक संसदेत मंजूर होण्याची वाट बघतोय, असं वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांना आश्वस्त करत सरकार योग्य प्रक्रियेद्वारे शेतकऱ्यांना संरक्षण देईल, असेही म्हटलं आहे.
वक्फ बोर्ड दुरूस्ती विधेयक संसदेत मंजूर होण्याची वाट बघतोय, असं वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयकावर भाष्य केलं त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलंय. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांना आश्वस्त करत सरकार योग्य प्रक्रियेद्वारे शेतकऱ्यांना संरक्षण देईल, असेही म्हटलं आहे. दरम्यान, आतापर्यंत लातूरमध्ये १०३ शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाकडून नोटीस आल्याचा दावा करण्यात आला आहे. यासंदर्भात विचारण्यात आलेल्या सवालावर देवेंद्र फडणवीस यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. ‘वक्फ बोर्ड दुरूस्ती विधेयक संसदेत मंजूर होण्याची वाट बघतोय. सरकार योग्य प्रक्रियेद्वारे शेतकऱ्यांना संरक्षण देईल. तर आमच्या संपत्तीवर आमचा अधिकार आहे. कोर्टात जाण्याची तरतूद न असणे हे घटनाविरोधी आहे. कोणत्याही धार्मिक संस्थेला आपली जमीन ठेवायची असेल तर कायदा व्हायला हवा. जिथे बोट ठेवतील ती त्यांची जमीन होऊ शकत नाही. ‘, असं इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस म्हणाले.