Maharashtra Exit Poll Results 2024 : राज्यात महायुती-मविआत काँटे की टक्कर, ‘लोकशाही रुद्र’चा एक्झिट पोल काय?

| Updated on: Nov 20, 2024 | 9:11 PM

सर्व समोर आलेल्या एक्झिट पोलचे आकडे पाहिले तर कुठे महायुतीला बहुमत आहे तर कुठे मविआचं सरकार येणाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र लोकशाही रुद्रच्या एक्झिट पोलनुसार राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे.

विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर आता निकालाची प्रतिक्षा असताना अनेक संस्थांनी आपल्या आकडेवारीत आपला आपला अंदाज वर्तवला आहे. सर्व समोर आलेल्या एक्झिट पोलचे आकडे पाहिले तर कुठे महायुतीला बहुमत आहे तर कुठे मविआचं सरकार येणाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र लोकशाही रुद्रच्या एक्झिट पोलनुसार राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. लोकशाही रुद्रच्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, महायुतीला १२८ ते १४६ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीला राज्यात १२५ ते १४० जागा मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. महायुतीला १२८ ते १४६ जागांपैकी भाजपला ८० ते ८५ जागा, शिवसेनेला ३० ते ३५ जागा आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला १८ ते २२ जागा मिळण्याचा अंदाज आहे. यासह महाविकास आघाडीला राज्यात १२५ ते १४० जागांपैकी काँग्रेसला ४८ ते ५५ जागा, ठाकरेंची शिवसेनेला ३९ ते ४३ जागा आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला ३८ ते ४२ जागा मिळण्याचा अंदाज आहे. बघा व्हिडीओ

Published on: Nov 20, 2024 09:11 PM
TV9 Reporter Exit Poll Results 2024 : राज्यात ‘मविआ’ची सत्ता? कोणाला किती जागा? ‘tv9 रिपोर्टर पोल’चा अंदाज काय?
Exit Poll Results 2024 : पोल ऑफ पोल, विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर राज्यात कोणाची सत्ता येणार? कोणाचा अंदाज काय?