‘ तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता…,’ काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
ज्यांनी आपली करोडो एकरची जमीन शैक्षणिक संस्थेला दिली.पुढील पिढ्यांना हमाली करायला लागू नये चौदा- पंधरा एकरची सिन्नरची जमीन ज्यांनी त्या काळात दान केली आहे, वंसतराव नारायणराव नाईक या स्वातंत्र्य सैनिकांचे मी रक्त आहे त्यामुळे वंजारी समाजाला कारण नसताना बदनाम करु नये असेही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी काल शनिवारी बीडमध्ये सर्वपक्षीय आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे भाषण झाले. या भाषणानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या गटाच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी जितेंद्र आव्हाड यांचे व्हॉट्सअप चॅट व्हायरल केले होते. त्यात जितेंद्र आव्हाड यांनी या मोर्च्यात राजकारण कसे केले याचे चॅटींग होते. मात्र, हा चॅट मॉर्फ केलेला असल्याची तक्रार जितेंद्र आव्हाड यांनी पोलिस ठाण्यात केली आहे. आपलं भाषण दुपारी झाले मग चॅट भाषण झाल्यानंतर कसा व्हायरल झाला ? सकाळीच झाला असता ना ? असा सवाल आव्हाड यांनी केला आहे. आपल्याला व्हॉट्सअपवरुन धमकी देखील आल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. लोक आता आमदारालाही धमक्या देत आहेत. यांचा माज गेलेला नाही. मी घाबरणारा आमदार नाही. माझी लढाई माणूसकीच्या बाजूने आहे. तुम्ही माणसे माराल आणि जातीचे नाव घेऊन मागे लपाल. मी पण त्याच जातीत जन्माला आलो आहे असेही आव्हाड यांनी म्हटले आहे.