‘मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव…’,पवार भेटीनंतर काय म्हणाले खासदार सोनावणे
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निघृण हत्या झाल्यानंतर महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्थेचे अक्षरश: धिंडवडे निघाले आहेत.या प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर या गावाला राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी भेट दिली आहे. या वेळी शरद पवार यांच्या सोबत खासदार बजरंग सोनावणे देखील हजर होते. बजरंग सोनावणे म्हणाले की पवार साहेब कालच येणार होते. परंतू संसदेचे अधिवेशन सुरु असल्याने आम्ही आज आलो. यावेळी या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी या प्रकरणात जे कोणी मास्टर माईंड आहेत त्यांची खोलात जाऊन चौकशी करण्याची शासनाकडे मागणी केली आहे. आज बीड जिल्ह्याची परिस्थिती किती भयानक आहे. देशमुख यांची मुलगी किती भयभीत होऊन बोलत होती. अख्खा गाव घाबरलेले भयभयीत झालेला असल्याचे खासदार बजरंग सोनावणे यावेळी म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात आरोपींवर मोक्का लावू असे म्हटलेले आहे. परंतू या प्रकरणात न्याय मिळण्यासाठी खऱ्या गुन्हेगाराला ताबडतोड अटक करा अशी मागणी खासदार बजरंग सोनावणे यांनी केली आहे.