युतीत कटुता; शिंदे गटातील आमदारांची अजित पवार यांच्यावर नाराजी? नेमकं कारण काय?
गेल्या काही दिवसापासून अजित पवार युतीत गेल्याने शिंदे गट नाराज झाल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर आता थेटच शिंदे गटातील आमदारांनी एका प्रकरणावरून अजित पवार यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
मुंबई : 22 ऑगस्ट 2023 | शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवार यांची आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटाने प्रवेश केला. यानंतर शिंदे गटात नाराजी असल्याचे बोलले जात होते. ती नाराजी आता समोर आली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार अजित पवार यांच्यावर शिंदे गट हा नाराज असून त्यांनी ही नाराजी थेट बोलून दाखवली आहे. तर त्यांनी समज दिली जावी अशी मागणी केली आहे. त्यावरून राज्यात एकच खळबळ उडालेली आहे. तर ही नाराजी ठाण्यातील कळवा येथील रुग्णालयात झालेल्या जवळपास 24 रुग्णांचा मृत्यू प्रकरणावरून असल्याचे बोलले जात आहे. तर अजित पवार यांनी याच मुद्द्यावरून मंत्र्यांच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धारेवर धरत काही सवाल केले होते. तर काळजी घेण्याबाबत ही सांगितलं होतं. तर हा मुद्दा वाढू नये म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप केला होता. त्यावरूनच आता शिंदे गटातील आमदारांत नाराजी आहे. तर त्यांच्याकडून अजित पवार यांना भाजपने समज द्यावी, त्यांना आवर घालावा अशी मागणी केल्याचे बोलले जात आहे.