Pune | शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या भेटीवेळी राज ठाकरे यांनी घातला मास्क
यावेळी राज ठाकरे यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. पुण्यातील पर्वती परिसरात असलेल्या बाबासाहेबांच्या निवासस्थानी मंगळवारी राज ठाकरेंनी ही भेट घेतली.
पुणे दौऱ्यावर असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare) यांची भेट घेतली. यावेळी राज ठाकरेंनी चक्क मास्क घातला होता. संपूर्ण दौऱ्यात विनामास्क असलेले राज ठाकरे या भेटीदरम्यान मास्क घालून बसले होते. यावेळी राज ठाकरे यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. पुण्यातील पर्वती परिसरात असलेल्या बाबासाहेबांच्या निवासस्थानी मंगळवारी राज ठाकरेंनी ही भेट घेतली.
Published on: Jul 21, 2021 09:58 AM