राज ठाकरेंच्या व्हीडिओवर ट्रस्टी म्हणाले, अनधिकृत असेल तर जरूर तोडा

| Updated on: Mar 23, 2023 | 9:34 AM

त्या जागेवर दर्गा नाही. कबरही नाही. तिथे एक बैठक आहे. ती बैठक 600 वर्ष जुनी आहे. तसेच ती वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृतही आहे असे म्हटलं आहे

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माहीम दर्गा येथे समुद्रात नवीन हाजी अली तयार करण्यात येत असल्याचा दावा केला आहे. माहीम समुद्रात अनधिकृतपणे जागा बळकावून कबर तयार केली जात असल्याचा दावा देखील त्यांनी केला होता. त्यानंतर यावर मगदूम शाह बाबा दर्गाहचे ट्रस्टी सोहेल खंडवानी यांनी राज ठाकरे यांचा हा दावा फेटाळून लावला आहे.

त्या जागेवर दर्गा नाही. कबरही नाही. तिथे एक बैठक आहे. ती बैठक 600 वर्ष जुनी आहे. तसेच ती वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृतही आहे असे म्हटलं आहे. तर आसपास जर अनधिकृत बांधकाम असेल तर ते जरूर तोडा त्याला आमचा विरोध वा आडकाठी राहणार नाही. तसेच त्यांनी कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये असे आवाहन नागरिकांना केलं आहे.

Published on: Mar 23, 2023 09:34 AM
सुपरफास्ट 50 न्यूज | राज्यातील घडलेल्या महत्वाच्या 50 घडामोडींचा वेगवान आढावा, सुपरफास्ट 50 न्यूज
राज ठाकरे यांचा काल सरकारला इशारा अन् आज कारवाई; माहिम दर्गाह परिसरात हालचाली वाढल्या