जर गुजरात पॅटर्न देशभर चालू शकतो तर… वसंत मोरे नेमकं काय म्हणाले?
भारतीय जनात पार्टीला पुण्यात थांबवण्यासाठी जे-जे पर्याय आहेत ते अवलंबवण्याचा प्रयत्न सुरू आहे. काँग्रेस हा सक्षम पर्याय नाही. जर गुजरात पॅटर्न देशभर चालू शकतो तर कात्रज पॅटर्न हा पुण्यात का चालू शकत नाही, असा सवाल करत वसंत मोरे म्हणाले, वसंत मोरे इज ईकव्हल टू पुणे, वसंत मोरे यांनी व्यक्त केला विश्वास
जर गुजरात पॅटर्न देशभर चालू शकतो तर कात्रज पॅटर्न पुण्यात का चालू शकत नाही, असं वक्तव्य वसंत मोरे यांनी केलं. तर पुणेकर माझ्या पारड्यात भरघोस मतं टाकतील, असा विश्वासही वसंत मोरे यांनी व्यक्त केला. मी अनेक नेत्यांना पाठिंबा मिळावा म्हणून भेट घेत आहे. तर प्रकाश आंबेडकर, सखल मराठा समाज माझ्या पाठिशी उभे असल्याचेही वसंत मोरे यांनी म्हटले. भारतीय जनात पार्टीला पुण्यात थांबवण्यासाठी जे-जे पर्याय आहेत ते अवलंबवण्याचा प्रयत्न सुरू आहे. काँग्रेस हा सक्षम पर्याय नाही. जर गुजरात पॅटर्न देशभर चालू शकतो तर कात्रज पॅटर्न हा पुण्यात का चालू शकत नाही, असा सवाल करत वसंत मोरे म्हणाले, वसंत मोरे इज ईकव्हल टू पुणे ,पुणेकर माझ्या पारड्यात भरघोस मत टाकतील. गुजरातचा विकास काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत चालतो तर मग कात्रज पुण्यात का नाही चालणार? असा सवालही त्यांनी यावेळी केला. मी अनेक नेत्यांना भेटतोय ते काही तिकिटासाठी नाही तर मी या सगळ्यांना भेटून पाठिंबा मागत आहे, असेही त्यांनी म्हटले.