बँकांना सुट्टी नाही, आटपून घ्या सगळी कामं

| Updated on: Mar 23, 2023 | 8:40 AM

सुट्टीचे दिवस आले की सगळा खोळंबा होतो. त्यामुळेच सर्व बँका खुल्या ठेवण्याच्या सूचना आरबीआयने दिल्या आहेत.

मुंबई : मार्च महिना म्हटलं की सगळीकडे घाई गडबड. त्यातच बँकांचा विषय सतत कानावर येणारा. नाही नको… शनिवारी आणि रविवार बँक बंद असते. पण आता घाबरण्याची गरज नाही. या मार्च महिन्यात बँकां सुरूच राहणार आहेत. बँकांना सुट्टी नाही.

मार्च महिना आणि हे आर्थिक वर्ष 2022-23 संपायला आता काहीच दिवस उरले आहेत. त्यामुळे बँकेची कामे आटोपून घेण्याकडे अनेकांचा कल असतो. त्यातच सुट्टीचे दिवस आले की सगळा खोळंबा होतो. त्यामुळेच सर्व बँका खुल्या ठेवण्याच्या सूचना आरबीआयने दिल्या आहेत.
31 मार्च हा चालू आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस आहे. या दिवशी बँकांमध्ये बंद(closing)चे काम केले जाते.

यामुळेच आरबीआयने सर्व बँकांना सरकारी व्यवहारांसाठी शाखा सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र या दिवशी बँकांमध्ये काम ग्राहकांसाठी कोणतेही केले जाणार नाही. पण, चेक जमा करू शकता. तसेच या दिवशी ऑनलाइन बँकिंगचे कामही सुरू राहणार आहे.

शिवसेनेत फुट का पडली? राज ठाकरेंनी इतिहासातले दोन किस्से सांगितले, अन् म्हणाले…
राज ठाकरे यांनी शिवसेना का सोडली? मनसेची स्थापना करताना कोणता विचार डोक्यात होता?