मास्क घालणं बंधनकारक आहे का? आरोग्यमंत्री तानाजी सावंत म्हणाले...

मास्क घालणं बंधनकारक आहे का? आरोग्यमंत्री तानाजी सावंत म्हणाले…

| Updated on: Apr 04, 2023 | 2:24 PM

Health Minister Tanaji Sawant Mask and Corona Virus : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय, मास्क घालणं बंधनकारक आहे का? आरोग्यमंत्री तानाजी सावंत म्हणाले...

मुंबई : राज्यात सध्या कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होतेय. या पार्श्वभूमीवर मास्क वापरणं बंधनकारक आहे का? असा प्रश्न विचारला जातोय. त्यावर राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ” राज्यात अद्याप मास्क वापरण्याची सक्ती नाही. पण आम्ही आवाहन करत आहोत की, ज्यांना लक्षण दिसत आहेत, त्यांनी मास्क वापरावा. आपल्यासह आपल्या कुटुंबियांनीच्या आरोग्यासाठी लक्षणं जाणवणाऱ्यांनी मास्क वापरावा”, असं आवाहन तानाजी सावंत यांनी केलं आहे. राज्यात सर्वेक्षण आणि परिक्षण सुरु आहे. काळजी करण्याचं कारण नाही. पण जर ताप, खोकला, सर्दी असेल तर अंगावर काढू नका. डॉक्टरांचा सल्ला घ्या, असं तानाजी सावंत म्हणाले आहेत.

Published on: Apr 04, 2023 02:24 PM