अवकाळी पावसाने शेतीचं मोठं नुकसान; महाविकास आघाडीचं विधिमंडळ पायऱ्यांवर आंदोलन
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा तिसरा आठवडा आहे. अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी आघाडीच्या आमदारांनी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनाच्या पायर्यांवर येत सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली. पाहा व्हीडिओ...
मुंबई : मागच्या दोन-तीन दिवसात राज्यात अवकाळी पाऊस पडला. या अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. यासाठी महाविकास आघाडीच्या आमदारांनी अधिवेशनादरम्यान आक्रमक भूमिका घेतली. विधानभवनाच्या पायर्यांवर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे झालेच पाहिजेत. अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळालीच पाहिजे. जाहीर करा, जाहीर करा शेतकऱ्यांना भरपाई जाहीर करा… कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही…, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
Published on: Mar 08, 2023 01:19 PM