Nawab Malik | चंद्रकांत पाटलांनी शिवरायांच्या नावाचं राजकारण केलं : नवाब मलिक

| Updated on: Dec 15, 2021 | 11:21 AM

शिवाजी महाराज रयतेचे राजे होते, कुणावर अन्याय त्यांनी केला नाही, सर्वधर्मियांना घेऊन ते सत्ता चालवत होते. चंद्रकांत पाटील यांनी तात्काळ माफी मागायला हवी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केलीय.

चंद्रकांत पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचं राजकारण केलंय. हिंदू मतांची वोटबँक तयार केली हे सांगणं महाराजांचा अपमान आहे. शिवाजी महाराज रयतेचे राजे होते, कुणावर अन्याय त्यांनी केला नाही, सर्वधर्मियांना घेऊन ते सत्ता चालवत होते. चंद्रकांत पाटील यांनी तात्काळ माफी मागायला हवी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केलीय. तर गिरीश महाजन यांनी पोलिस दलाला बदनाम करण्याचं काम केलंय. पोलीस दलात महिलाही असतात, त्यांनी तात्काळ माफी मागावी, असं नवाब मलिक म्हणाले.

Viay Wadettiwar | सुप्रीम कोर्टाचा निकाल ओबीसींच्या बाजूनं लागेल अशी खात्री : विजय वडेट्टीवार
Bacchu Kadu | ओमिक्रॉन एवढा प्रभावी आणि परिणामकारक ठरेल असं वाटत नाही : राज्यमंत्री बच्चू कडू