‘अरे बच्चू कडू कोण आहे बाबा?’, ‘त्या’ वक्तव्यावरून शरद पवार यांचा बच्चू कडू यांना टोला
VIDEO | आमदार बच्चू कडू यांनी शरद पवार यांच्यावर भाष्य करताना म्हटले होते, 'शरद पवार जे बोलातात ते कधीच करत नाही', या वक्तव्यावरून शरद पवार यांनी उडवली खिल्ली, म्हणाले, 'उद्या गल्ली बोळातील लोकांविषयी...'
कोल्हापूर, २६ ऑगस्ट २०२३ | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आधी अजित पवार हे आमचे नेते आहेत. राष्ट्रवादीत फूट पडली नाही असं विधान काल केलं होतं आणि अवघ्या पाच तासातच शरद पवार यांनी युटर्न घेतला. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. या सर्व घडामोडींवर आमदार बच्चू कडू यांनी भाष्य केले आहे. काका – पुतण्या मिळून महाराष्ट्राला वेड्यात काढत आहेत का? असा प्रश्न आमदार बच्चू कडू यांना माध्यमांनी केला असता बच्चू कडू यांनी आपली थेट प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘शरद पवार जे म्हणतात ते शरद पवार करत नाहीत किंवा ते जे बोलतात त्यांनी तसं कधीच केल्याचं दिसत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसची सध्या सर्व सुरू असलेली खेळी पाहिली आणि जास्त लक्ष दिलं तर डोकं फुटायची वेळ येईल’. याटीकेवरच आता शरद पवार यांनी उत्तर दिले आहे. कोल्हापुरात झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवारांना यासंदर्भात विचारणा केली असता. ते म्हणाले, अरे बच्चू कडू कोण आहे बाबा? मी एका राष्ट्रीय पक्षाचा अध्यक्ष आहे. चार वेळा राज्याचा मुख्यमंत्री होतो. केंद्रात मोठी जबाबदारी होती. त्यामुळे तुम्ही कुणा गल्ली बोळातील लोकांबाबत प्रतिक्रिया मला मागाल…असे शरद पवार म्हणाले.