‘अजित पवार यांना शरद पवार यांचा छुपा पाठिंबा’, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नेत्याचं मोठं वक्तव्य
VIDEO | 'शरद पवार म्हणाले अजित पवार यांना पक्षात परत येण्यासाठी संधी नाही किंवा दुसरा चान्स नाही याचा अर्थ...', एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील आमदार संजय शिरसाट यांचं मोठं वक्तव्य
औरंगाबाद, 26 ऑगस्ट 2023 | राष्ट्रवादीमध्ये जे काही सध्या सुरू आहे. त्यावरून संभ्रमाची अवस्था निर्माण झाली आहे. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे एकच गोंधळ उडाला असताना शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी मोठं विधान केलं आहे. ते म्हणाले, शरद पवार यांनी अजित पवार यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य त्यांनी काही तासातच बदललं, हा गोंधळ का सुरु आहे? कारण काही लोकांना शरद पवार यांची भूमिका कळत नाहीये, यामध्ये महत्वाचं म्हणजे त्यांनी केलेलं वक्तव्य त्यांनी का बदलले? शरद पवार जे बोलतात ते करत नाही आणि जे करतात ते बोलत नाही, असे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी केले. शरद पवार म्हणाले अजित पवार यांना पक्षात परत येण्यासाठी संधी नाही किंवा दुसरा चान्स नाही याचा अर्थ आता कुठेच जायचं नाही आहे तिथंच थांबायचं, असा होतो. शरद पवार यांना सुप्रिया सुळे यांना पुढं आणायचं आहे आणि त्यात गैर काहीच नाही. मात्र ते अजित दादा यांच्या विरोधात आहे, असे कुठेच वाटत दिसत नाही. त्याच्या पक्षाच्या अंतर्गत जरी हा निर्णय असला तरी त्यांनी घेतलेली भूमिका ही कणखर वाटत नाही. याचाच अर्थ म्हणजे शरद पवार यांनी अजित दादांनी घेतलेला निर्णय बरोबर आहे आणि शरद पवार यांचा त्यांना छुपा पाठिंबा आहे, असेच दिसत असल्याचे संजय शिरसाट म्हणाले.