Special Report | मविआत लोकसभेच्या जागांवरुन हंगामा? कुणी काय केला दावा?
VIDEO | काँग्रेसच्या 3 जागांवर राष्ट्रवादीचा दावा? महाविकास आघाडीमध्ये लोकसभेच्या जागांवरुन आरोप-प्रत्यारोप, बघा स्पेशल रिपोर्ट
मुंबई : महाविकास आघाडीतील तिनही पक्षांनी लोकसभा निवडणुकीची चाचपणी सुरू केली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत १८ जागांवर ठाम असल्याचे सांगताय तर दुसरीकडे काँग्रेसच्या 3 जागांवर राष्ट्रवादीनं दावा केल्याचे पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीतील जागा वाटपांवरून मविआतील गुंता दिवसेंदिवस वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण संजय राऊतांकडून १८ जागांचा दावा केला जातोय आणि त्यावर ते ठाम आहेत. २०१८ लोकसभा निवडणुकीला १८ खासदार निवडून आले म्हणून यंदा १८ जागा लढणारच, असं संजय राऊत यांनी म्हटलंय. शरद पवार यांच्या निवासस्थानी सिल्व्हर ओक येथे अद्याप एकच बैठक झाली. जागावाटपाबाबत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाच्या बैठका सुरू झाल्या आहेत. हे तिनही पक्ष आपापले दावे करताय. विशेषतः काँग्रेसच्या 3 जागांवर राष्ट्रवादी मागणी करतेय. सोलापूर येथील जागा २०१९ ला काँग्रेस लढली होती पण राष्ट्रवादी इच्छुक आहे. पुण्यात भाजपच्या गिरीष बापट यांच्या निधनामुळे पुण्यात सभा लोकसभेची जागा रिक्त आहे. ही जागा २०१९ ला काँग्रेस लढली होती. त्यावर राष्ट्रवादी इच्छुक आहे. वर्धाच्या लोकसभेच्या जागेवर २०१९ ला राष्ट्रवादीने भाजप विरोधात उमेदवार दिला होता. या जागेवर देखील राष्ट्रवादी इच्छुक असल्याचं बोललं जातंय. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट…