Amol Mitkari | ‘धार्मिक क्षेत्रातही भाजपकडून राजकारण’-tv9
धार्मिक क्षेत्रातही भाजपकडून राजकारण केले जात असल्याचे राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे
पुणे : श्री संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) पुणे दौऱ्यावर होते. ते नरेंद्र मोदींसोबत या लोकार्पण कार्यक्रमासाठी व्यासपीठावरही अजित पवार उपस्थित होते. परंतु, या कार्यक्रमात भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मनोगत व्यक्त केले. मात्र, अजित पवार यांना बोलण्याचा मान दिला नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नाराजी व्यक्त केली. यातच अजित पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच पुण्याचे पालकमंत्री आहेत, याचे भान पंतप्रधान मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांना असायला हवे होते, या शब्दांत राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी खंत व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी धार्मिक क्षेत्रातही भाजपकडून राजकारण केले जात असल्याचे म्हटलं आहे. याचबरोबर जर धार्मिक क्षेत्रातही भाजपकडून राजकारण केले जात असेल तर वारकरी संप्रदाय आणि राज्यातील जनता ते खपवून घेणार नाही असा इशारा आमदार मिटकरी यांनी भाजपला दिला आहे.