Sunanda Pawar : राष्ट्रवादी पुन्हा एक होणार? शरद पवार अन् अजितदादा एकत्र येणार? रोहित पवारांच्या आईनं काय केलं वक्तव्य?
अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीबाबत प्रश्न विचारण्यत आला. तेव्हा यावेळी शरद पवार आणि अजित पवार यांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं सुनंदा पवार म्हणाल्या. तर दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र येण्याची गरज आहे, मूठ घट्ट राहिली ताकद वाढणार आहे, असेही त्या म्हणाल्या.
अजित पवार आणि शरद पवार यांच्या दोन्ही गटाने अर्थात राष्ट्रवादीने एकत्र येण्याची गरज आहे, मूठ घट्ट राहिली पाहिजे, असं वक्तव्य शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांनी केलं आहे. कुटूंब म्हणून आता एकत्र येण्याची गरज असल्याचेही मोठं वक्तव्यही सुनंदा पवार यांनी केलं आहे. तर शरद पवार आणि अजित पवार यांची झालेली भेट ही राजकीय नसून कौटुंबिक होती, असंही त्यांनी म्हटलं आहे. पुढे त्या असंही म्हणाल्या, शरद पवारांचा काल ८५ वा वाढदिवस साजरा झाला असून त्यांच्या आयुष्याचा हा मोठा टप्पा आहे. विरोधकांच्या टीकेवर बोलताना त्या म्हणाल्या, दादा कोणालाही भेटले, कुठेही गेले, काहीही बोलले तरी त्याची बातमी होते. असं म्हणत असताना कुटुंबात मतभेद हे असतातच. मतभेद मिटून अजित पवार आणि शरद पवार हे एकत्र येऊ शकतात. दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र येण्याची गरज आहे. सत्तेसोबत जायचं का याबाबत शरद पवार निर्णय घेणार आहेत, असं सुनंदा पवार म्हणाल्या आहेत. तर मूठ घट्ट राहिली ताकद वाढते. पण जर विखुरलेले राहिले तर त्याची ताकद कमी होते. त्यामुळे एकत्र राहणं हे कधीही चांगलं असल्याचं मत सुनंदा पवार यांनी व्यक्त केलं.