सुपरफास्ट 50 न्यूज | राज्यातील घडलेल्या महत्वाच्या 50 घडामोडींचा वेगवान आढावा, सुपरफास्ट 50 न्यूज
कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी अवघ्या दहा मिनिटात पाहणी दौरा जळगाव जिल्ह्यातील धरणगाव आटपल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे
सुपरफास्ट 50 न्यूज | राज्यातील काही भागांमध्ये गेल्या काही दिवसापासून अवकाळी पावसाने हजेरी लावत लाखोंचे नुकसान केलं आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल जाला आहे. यातच आता पुढील चार दिवस पावसाचा हलक्या सरांची शक्यता हवामान विभागाने वर्तवल्याने पुन्हा चिंता वाढली आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात 25 मार्च पर्यंत पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी अवघ्या दहा मिनिटात पाहणी दौरा जळगाव जिल्ह्यातील धरणगाव आटपल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर 10 मिनिटात दौरा आटोपल्याने आदित्य ठाकरे यांनी अब्दुल सत्तार यांना टोला लगावला आहे. आदित्य ठाकरे यांनी कृषिमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर गेले की गुवाहाटीला असा सवाल केला आहे. तर विधानभवनात बसण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या बांधावर जा असा सल्ला टीका संभाजी राजे यांनी अब्दुल सत्तार यांना दिला आहे.
तर कल्याणच्या आधारवाडी मध्ये गणेश चौक परिसरात जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी रस्त्यावर नागरिकांना पाण्यातून मार्ग काढत करावा लागत आहे. दरम्यान मार्च अखेर असल्याने 31 तारखेपर्यंत बँकांमध्ये सुट्टी राहणार नाही असे निर्देश रिजर्व बँकेचे सर्व बँकांना आहेत. 31 तारखेच्या मध्यरात्री 12 वाजेपर्यंत आरटीजीएस ही सेवा ही देण्याचे आदेश ही आहेत.