Congress Breaking | नितीन राऊत, पटोले वाद राहुल गांधींच्या दरबारात?, थोरात, राऊत दिल्लीत दाखल!

| Updated on: Jul 09, 2021 | 12:48 PM

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्यातील वाद आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. पटोलेंशी झालेल्या मतभेदामुळे नितीन राऊत थेट राहुल यांना भेटण्यासाठी दिल्लीत दाखल झाले आहेत.

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्यातील वाद आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. पटोलेंशी झालेल्या मतभेदामुळे नितीन राऊत थेट राहुल यांना भेटण्यासाठी दिल्लीत दाखल झाले आहेत. राहुल यांची भेट घेऊन ते पटोले यांची तक्रार करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. राऊत यांच्यासोबत राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरातही आहेत. राऊत आणि थोरात एकत्र आल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात असून महाराष्ट्र काँग्रेसमध्ये काहीही अलबेल नसल्याचं बोललं जात आहे.

नितीन राऊत आणि बाळासाहेब थोरात आज अचानक दिल्लीत दाखल झाले आहेत. ते राहुल गांधी आणि काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल यांची भेट घेण्याची शक्यता आहे. पक्षांतर्गत मतभेदावरून ते राहुल यांची भेट घेणार आहेत. खास करून पटोले आणि राऊत यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून वाद सुरू आहे. त्याची तक्रार राहुल यांच्याकडे केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे, असं सूत्रांनी सांगितलं.

Mahadev Jankar यांच्या सभेच्या नियोजनाची जबाबदारी पार पाडणारे Bhagwat Karad आता केंद्रात मंत्री
Nagpur Crime | नागपुरात 5 जुलै रोजी अवनी ज्वेलर्सवर दरोडा, दरोड्याचं CCTV फूटेज समोर