AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pahalgam Terror Attack : नागपूरचे तिलक रूपचंदानी पहलगाममध्ये फसले; हल्ल्यात पत्नी जखमी, संपर्क होतं नसल्याने परिवार चिंतेत

Pahalgam Terror Attack : नागपूरचे तिलक रूपचंदानी पहलगाममध्ये फसले; हल्ल्यात पत्नी जखमी, संपर्क होतं नसल्याने परिवार चिंतेत

| Updated on: Apr 23, 2025 | 8:55 AM

Jammu Kashmir Pahalgam Terror Attack : जम्मू – कश्मीर येथील पहलगाम येथे मंगळवारी सकाळी अतिरेक्यांनी अमानुष हल्ल्यात २७ पर्यटक ठार झाल्याचे उघडकीस आले आहे. जम्मू-कश्मीराल कलम ३७० रद्द केल्यानंतराचा हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ल्या असल्याचे म्हटले जात आहे.

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या आतंकी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. यात महाराष्ट्रातल्या 6 नागरिकांचा समावेश आहे. तर 8 जण जखमी आहेत. या घटनेत नागपूरचं तिलक रूपचंदानी कुटुंब देखील आहे. 16 एप्रिल रोजी तिलक रूपचंदानी आपल्या परिवारासह जम्मू – काश्मीरला फिरायला गेले होते. 27 तारखेला नागपूरला परतणार होते. मात्र त्याठिकाणी त्यांच्या पत्नी या हल्ल्यात जखमी झाल्या असल्याचं वृत्त आहे. नागपूर येथील रूपचंदानी यांच्या कुटुंबाकडून तिलक रूपचंदानी यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र त्यांच्याशी संपर्क होत नसल्याने परिवार चिंतेत असल्याचं रूपचंदानी परिवाराने टीव्ही 9 मराठीच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितलं. तिलक रूपचंदानी यांचे भाऊ यावेळी म्हणाले की, आम्हाला घटनेची माहिती बातम्यांमधूनच कळाली. त्यानंतर आम्ही आमच्या भावाला संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्याशी कोणताही संपर्क झालेला नाही. तिलक रूपचंदानी यांच्या पत्नी या हल्ल्यात जखमी झाल्या आहेत असंही आम्हाला बातम्यांमधूनच समजलं. माझा भाऊ आणि त्याचा परिवार घरी सुखरूप यावे एवढीच आमची आता इच्छा आहे, असं यावेळी तिलक रूपचंदानी यांच्या भावाने सांगितल.

Published on: Apr 23, 2025 08:55 AM