बैलगाडा शर्यतीच्या घाटात बैलांनीच घातला तुफान राडा, कुठं घडली घटना? बघा व्हिडीओ
VIDEO | बैलगाडा शर्यतीच्या घाटात बैलांमध्येच तुंबळ हाणामारी, बैलाने लोकांच्या अंगावर झेप घेतली झेप अन्...
पुणे : ग्रामीण भागात बैलगाडा शर्यत चांगलाच चर्चेचा विषय असते. ग्रामीण भागात बैलगाडा शर्यतीचे शौकीन देखील असतात. ही बैलगाडा शर्यती बघण्यासाठी शौकीनांची गर्दी होत असल्याचे अनेकदा बघायला मिळतं आणि याच गर्दीत धक्काबुक्कीमुळे राडे झाल्याचेही समोर आले आहे. मात्र पुण्यात एक वेगळाच प्रकार घडलाय. पुण्यात बैलगाडा शर्यतीच्या घाटात बैलांनीच राडा केल्याचे समोर आले आहे. ही घटना पुण्यात ग्रामीण भागात घडली आहे. पुण्यात यात्रेनिमित्ताने बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. बैलगाडा घाटातही शौकिंनांची तुंबळ गर्दी झाली होती. यावेळी बैलगाडा जुंपण्याच्या वेळी बैलांनीच घाटात राडा घातला. हा प्रकार इथच न थांबता बैलाने लोकांच्या अंगावर झेप घेऊन अक्षरशः पायाखाली तुडवल्याचा प्रकारही घडला. यामध्ये कोणालाही गंभीर इजा झाली नसली तरी शर्यतीच्या घाटात बैलांचा राडा चांगलाच चर्चेत आला आहे.