स्वाभिमानीचा ‘आक्रोश मोर्चा’ होणारच, राजू शेट्टी आंदोलनावर ठाम

| Updated on: Aug 21, 2021 | 2:46 PM

राजीव गांधी जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शेट्टी यांना थोड थांबण्याच आवाहन केलं होतं. मात्र, राजू शेट्टी यांनी आंदोलनावर ठाम भूमिका घेतली आहे.

कोल्हापूर : स्वाभिमानीचा 23 ऑगस्टला आक्रोश मोर्चा होणारच आहे, अशी भूमिका राजू शेट्टी यांनी घेतली आहे. राजीव गांधी जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शेट्टी यांना थोड थांबण्याच आवाहन केलं होतं. मात्र, राजू शेट्टी यांनी आंदोलनावर ठाम भूमिका घेतली आहे. मंत्री मुश्रीफ यांच्या आवाहनाला शेट्टी यांनी प्रत्युत्तर दिलं. राज्य सरकार वेळकाढूपणाचे धोरण घेत आहे. शेतकऱ्यांना गंडविण्याचा हा प्रकार असल्याची टीका राजू शेट्टी यांनी केली आहे. फसवणूक होऊ नये असं वाटत असेल तर शेतकऱ्यांनो पायातलं हातात घ्या आणि मोर्चात सामील व्हा, असं आवाहन राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना केलं आहे.
मदतीबाबत अजून निर्णय झाला नाही, असं मंत्री सांगतात. वेळकाढूपणाचं धोरण राबवण्याचा प्रकार आहे. शेतकऱ्यांना सरळ सरळ गंडवण्याचा प्रकार आहे. शेतकऱ्यांना 2019 ला उसाला भरपाई गुंठ्याला 900 रुपये मदत मिळाली होती. आता मिळणारी तटपुंजी मदत घ्यायची का, हे शेतकऱ्यांनी ठरवावं, असं राजू शेट्टी म्हणाले.

Lockdown : तर संपूर्ण राज्यात लॉकडाऊन लावावा लागेल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा इशारा
कोरोना काळात गंगा नदीची स्थिती पाहून भाजपला आशीर्वाद का द्यावेत, जनतेला प्रश्न पडलाय: बाळासाहेब थोरात