काँग्रेसच्या उमेदवाराला लाज वाटायला पाहिजे, प्रणिती शिंदेंवर कोण भडकलं, कुणी केला पलटवार?
जेव्हा भाजपकडे मुद्दे नसतात तेव्हा ते तेढ निर्माण करतात. मागच्या निवडणुकीतही भाजपने पुलवामा घडवलं, असं वक्तव्य काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे यांनी करत भाजपवर हल्लाबोल केला. तर काँग्रेसच्या उमेदवाराला लाज वाटायला पाहिजे, असा पलटवार राम सातपुते यांनी केला.
जेव्हा भाजपकडे मुद्दे नसतात तेव्हा ते तेढ निर्माण करतात. मागच्या निवडणुकीतही भाजपने पुलवामा घडवलं, असं वक्तव्य काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे यांनी करत भाजपवर हल्लाबोल केला. तर काँग्रेसच्या उमेदवाराला लाज वाटायला पाहिजे, असा पलटवार राम सातपुते यांनी केला. ‘सावध रहा.. भाजपकडे मुद्दे नसतात तेव्हा ते तेढ निर्माण करतात ही भाजपची पद्धत आहे. मागच्या वेळी सुद्धा भाजपने पुलवामा घडवलं. भाजप ऐवढ्या खालच्या पातळीवर जातंय. त्यामुळे त्यांची मानसिकता तुम्हाला कळायला पाहिजे,’ असं प्रणिती शिंदें यांनी म्हटलं. यावर पलटवार करत राम शिंदेंनी प्रत्युत्तर दिलं ते म्हणाले, कॉंग्रेसच्या उमेदवाराला लाज वाटायला पाहिजे, असं म्हणत राम सातपुते म्हणाले, ज्या जवानांनी देशासाठी आपलं रक्त सांडलं. देशाची रक्षा केली. जो हल्ला पाकिस्तानने केला. त्यात आपले जवान शहीद झाले. त्या हल्लाबद्दल भाजपवर आरोप करताय. हा अपमान भाजपचा नाही, निवडणुका येतील जातील, तर तुम्ही देशाशी गद्दारी करत आहात, असा हल्लाबोलही राम सातपुतेंनी केला.